सहाव्वे गिधाड
सहाव्वे गिधाड तर तुम्हीच का ते वैद्य ? तुम्हाला मी वाचावं म्हणून माझ्यावर वजन येईल असा वशिला लावून तुम्ही मला भेटताहात. बरोबर? कशासाठी ? हे असलं तुमच्यासारख्या फडतूस कवड्याचे कवडीमोल कवित्व मला दाखवण्यासाठी ? आणि आता ते छापाss म्हणून सांगताय मला आणखीन तोंड वर करून? ओळखीचा एवढा गैरफायदा घेऊ नये वैद्य . मतीमंद पोरींवर बलात्कार काय होत नाहीत? अहो रेग्युलरली होतच असतात. अगदी देवा ब्राह्मणांच्या साक्षीनेही होतात. हां, आता या बलात्काराचं वेगळेपण एवढंच की हा स्थीर जमिनीवर होण्याऐवजी चालत्या रेल्वेत झाला. त्यात फर्स्टक्लास मधे झाला. फार्स्टक्क्लास.... , व्हेअर डॉग्ज ॲंड इंडियन्स आर स्टील नॉट अलावड . त्यात तो पाचामुखी परमेश्वर अशा पांढऱ्या पांढऱ्या धोप स्वच्छ जगातील पाच पांढरपेशांसमोर झाला. या बलात्काराचं नशीब एवढं थोर की त्या पंचमंडळीत फाड फाड इंग्रजी बोलणारी एक महिला पत्रकार होती, विद्यमान सरकारची विरोधक. त्यामुळेच तर तो गाजतोय पेपरातून, दर पाच दहा वर्...